। पालघर । प्रतिनिधी ।
मीरा रोड येथे राहणार्या हिना अब्दुल सलमानी (36) यांना मीरारोड येथे हेवी डिपॉझिटवर फ्लॅट भाड्याने पाहिजे होता. 18 ऑगस्ट रोजी एका संकेतस्थळावर फ्लॅटचा शोध करत असता त्यांना एक फ्लॅट आवडल्याने त्यांनी इस्टेट एजेंट कुणाल सिंग याच्याशी संपर्क केला. यावेळी इस्टेट एजंट कुणाल सिंगने त्याचा मित्र शाहरुख अहमद याच्याशी संपर्क साधायला सांगितला. यानंतर इस्टेट एजंट शाहरुखने हिना यांना संबंधित फ्लॅट दाखविला. तसेच, सोबत एक इसम हा फ्लॅटचा मालक असल्याचे सांगण्यात आले. हिना यांना फ्लॅट आवडल्याने त्यांनी रुममालकासोबत हेवी डिपॉझिटचा करार केला. यासाठी रूम मालकाला 9 लाख 50 हजार रुपये देण्यात आले होते.
यानंतर 22 ऑगस्ट रोजी हिना सलमानी यांनी रुमचा ताबा मिळण्यासाठी इस्टेट एजंट आणि रुम मालकांना फोन केला असता त्यांचे फोन बंद आले. यावेळी त्यांनी सोसायटीमध्ये जाऊन शाहनिशा केली असता संबंधि व्यक्ती ही बनावट इस्टेट इजेंट आणि तोतया मालक असल्याचे त्यांना समजले. त्यांनी या घडलेल्या प्रकाराची शाहनिशा केली असता त्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यांनी 5 सप्टेंबर रोजी बनावट इस्टेट इजंट आणि तोतया रुम मालक यांच्या विरुद्ध काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात आरोपीचा तपास करून शाहरुख नियाज अहमद (28), आफताफ मोहनुजमा आलम (45), रमेश गिसीअवन शर्मा (37) हे तिघेही मीरारोड येथे राहणारे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.