| पनवेल | वार्ताहर |
एटीएमची अदलाबदल करून तिघांची फसवणूक केल्याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोट कॅम्प कोयनावळे येथील संजय कदम हे एटीएममध्ये कार्ड चालू करण्यासाठी गेले. यावेळी पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने कार्ड चालू करून देतो, असे बोलून त्यांच्या एटीएम कार्डद्वारे खात्यातील रक्कम काढली. कदम यांचे एटीएम कार्ड त्यांना परत करत तो इसम त्या ठिकाणाहून निघून गेला. कार्ड चालू झाल्याने कदम घरी गेले. काही वेळानंतर यांच्या सेव्हिंग खात्यामधून 28 हजार 750 काढून घेण्यात आल्याचा संदेश आला. अशाच प्रकारे नावडे येथील जितेंद्र बुरटे आणि अशोक सावंत यांच्या खात्यातील देखील पैसे काढण्यात आले. या प्रकरणांचा तळोजा पोलीस तपास करीत आहेत.