। पनवेल । वार्ताहर ।
वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एका निवृत्त व्यक्तीकडून 10 लाख रुपये उकळणार्या दुकलीविरोधात नेरूळ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नेरूळ सेक्टर 19 ए मध्ये राहणारे मंगेश मुळगावकर (वय 64) यांच्या मुलाचे 2019 मध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाले होते. त्यांच्या मुलाच्या पुढील शिक्षणासाठी कॉलेज शोधत होते. त्यावेळी अविनाश पाटील याच्या ओळखीतून स्वरूप मुळे व अभिमन्यू आघाव यांनी मुळगावकर यांना नेरूळमधील डी. वाय. पाटील कॉलेज परिसरात बोलावून घेतले होते.
त्यावेळी या दोघांनी मुळगावकर यांच्या मुलाला वर्धा येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच तीन वर्षांच्या शिक्षणाची फी 66 लाख रुपये व त्यांचे काम करून देण्यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यावेळी मुळगावकर यांनी 10 लाख रुपयांचा धनादेश त्यांना दिल्यानंतर पुढील 10 दिवसांत त्यांच्या डमिशनचे काम होईल, असे सांगितले होते. त्यानंतर टाळाटाळ सुरू केली. स्वरूप याने तीन महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने तीन लाख 75 हजार रुपये मुळगावकर यांना दिले. मात्र उर्वरित सहा लाख 25 हजार रुपये देण्यास त्यांनी टाळाटाळ केली.