वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत तपासणी

| नेरळ | प्रतिनिधी |

रायगड मेडिकल असो. आणि कर्जत मेडिकल असो. यांच्या माध्यमातून आरोग्यदायी आणि आनंददायी वारीसाठी वारी मार्गात आरोग्य शिबीर घेतले जातात. दरम्यान, रायगड मेडिकल असो.तर्फे सासवड येथील बोरकर मळा येथे पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीबरोबर सुमारे 70 किमी प्रवास करून आलेल्या भाविक वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या शिबिराचे नेतृत्व डॉ. अशुतोष कुळकर्णी, रायगड मेडिकल असो.चे अध्यक्ष आणि डॉ. प्रशांत गांगल व सचिव रायगड मेडिकल असो. यांनी केले. या शिबिरात डॉ. दिलीप सवळे, डॉ. श्रीकांत डहाके, डॉ. निलेश म्हात्रे, डॉ. श्रीश म्हात्रे आणि डॉ. संजय भामरे यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरामध्ये 150 हून अधिक वारकऱ्यांनी लाभ घेतला. यावेळी आवश्यक औषधांचे वाटप देखील रायगड मेडिकल असो. तर्फे करण्यात आले.

Exit mobile version