| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर मोठा प्रतिसाद लाभला. बेलोशी ग्रामपंचायत सभागृहात श्री सत्यसाई संघटना, मुंबई मेट्रो प्रदेश, महाराष्ट्र आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या विद्यमाने मंगळवार, दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोफत नेत्र व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. सलग 13 वेळा नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरासाठी श्री सत्यसाई संघटना, मेट्रो प्रदेश जिल्हाध्यक्ष कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सत्यसाई संघटनेचे सुरेश मेहेर, नरेश पटेल, शिवराम पटेल, रोहन पाटील, सुबोध भोसले, देवानंद हाले, अर्चना पारखी, विकास हाले, जागृती हाले यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. तर, आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या वतीने प्रकाश पाटील, डॉ. अर्पणा हरी, मृण्मयी जाधव, सोनाली पंदेरे, ज्ञानोबा कांबळे व बेलोशी सरपंच कृष्णा भोपी यांचे सहकार्य लाभले. या शिबिरास थेरोंडा, भेरसे व नागावमधील श्री सत्यसाई संघटनेचे सेवादल सहभागी झाले होते. या शिबिराचा लाभ परिसरातील गरजूंनी घेतला. एकूण 140 जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. यामध्ये 26 जण मोतिबिंद रूग्ण असून, त्यांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे.