हिंदू -भंडारी सेवाभावी संस्थेकडून मोफत आरोग्य तपासणी शिबीर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
हिंदू -भंडारी सेवाभावी संस्थेकडून मोफत आरोग्य तपासणी शिबीर रा.जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, धोकवडे, येथे संपन्न झाला. शिबिराचे उदघाटन व दीप प्रज्वलन सातिर्जे ग्रामपंचायत सरपंच प्राजक्ता प्रसन्न खडपे, रा.जि.प. शाळा धोकवडे शाळा समिती अध्यक्ष दिनेश माळवी, काळोशी ग्रामपंचायत उपसरपंच संतोष कनगुटकर, इंडीयन मेडिकल असो चे अलिबाग अध्यक्ष डॉ विनायक पाटील यांच्या हस्ते पार पडले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तोडणकर गुरुजी, राजनभाई नार्वेकर, प्रशांत नार्वेकर, महेश कुनूमल, ड कांचन नार्वेकर, ड जयंत चेऊलकर, तुकाराम शिळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते. आरोग्य शिबिरात अवघ्या 2 तासात 150 जणांची तपासणी झाली.तसेच त्यांना औषधे व गोळ्या देण्यात आल्या. शिबिरासाठी बालरोगतज्ञ डॉ विनायक पाटील, डॉ राजेंद्र चांदोरकर, अस्थिरोग तज्ञ डॉ राहुल म्हात्रे , दंतचिकित्सक डॉ अक्षय कोळी, डॉ नीरज कोळी, नॅचरोप्याथी डॉ प्रज्योत पाटील, जनरल फिजिशियन) डॉ प्रणाली पाटील, स्त्री रोग तज्ञ डॉ स्मिता चांदोरकर, त्वचारोग तज्ञ डॉ निशिगंधा म्हात्रे, डॉ शाहिदा अन्सारी आणि प्रयाग आय केअर सेंटर चे नेत्रतपासणी साहिल सतीश म्हात्रे वरील सर्व तज्ञ डॉक्टर्स आरोग्य शिबिरात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे खजिनदार श्री. विनोद टेंबुलकर यांनी केले तसेच हिंदू -भंडारी सेवाभावी संस्थेचा हा उपक्रम उत्तमरित्या पार पाडण्यासाठी संस्थेची पदाधिकारी ऊी. प्रणाली पाटील व संस्थेचे अध्यक्ष श्री. तुकाराम तोडणकर (आप्पा ), संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सचिन खोत व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी मोलाची कामगिरी केली.

Exit mobile version