मोफत आरोग्य तपासणी शिबीर

| सुकेळी | वार्ताहर |
नागोठणेजवळच असलेल्या सुकेळी येथील बी.सी. जिंदाल चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरुळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन जिंदाल हॉस्पिटल, सुकेळी येथे शनिवार, दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये इसीजी, डायबेटिस तपासणी, ब्लडप्रेशर, नेत्र तपासणी (अल्प दरात चष्मा) इत्यादी तपासण्याचे निदान करुन यामध्ये कोणाला काही त्रास असल्यास किंवा ऑपरेशनची गरज वाटल्यास महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य या अंतर्गत केशरी किंवा पिवळ्या रेशनकार्ड धारकांसाठी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी येताना रुग्णांनी सोबत रेशनकार्ड, बँकपासबुक, आधारकार्ड व जुने रिपोर्ट घेऊन येणे गरजेचे आहे. तरी संधीचा घ्यावा, असे आवाहन जिंदाल रुग्णालयाचे व्यवस्थापक जयरमण नडार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9764265472 या नंबरवर संपर्क साधावा.

Exit mobile version