| सुकेळी । वार्ताहर ।
शिहु येथील डॉ. भोईर क्लिनिक व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर नेरुळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य मोफत तपासणी रविवार (दि. 28) ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये इसीजी, डायबेटिस तपासणी, ब्लडप्रेशर, नेत्र तपासणी इत्यादीचे निदान करुन यामध्ये कोणाला ऑपरेशनची गरज वाटल्यास महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य या अंतर्गत केशरी किंवा पिवळ्या रेशनकार्ड धारकांसाठी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी येतांना रुग्णांनी सोबत रेशनकार्ड, बँकपासबुक, आधारकार्ड व जुने रिपोर्ट घेऊन येणे गरजेचे आहे. तरी या सुवर्णसंधीचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन डॉ.पुरुषोत्तम भोईर (मो.नं. 9421168177) यांनी केले आहे.