I रायगड I खास प्रतिनीधी I
इर्शालवाडीच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. एमएसआरडीसीने खालापूर तालुक्यातील मानिवली येथील जमिनी रहिवासी कारणासाठीच्या रेखांकनास मंजुरी दिली आहे. 27/1 ब हा प्लाॅट हरितक्षेत्र-1 मध्ये येत असल्याने विकास करताना काही अटी शर्ती घालून दिल्या आहेत.
19 जुलै 2023 रोजी इरर्शालवाडीवर दरड कोसळली होती. बचाव पथकाने 27 मृतदेह बाहेर काढले हाेते.तर अद्यापही 57 नागरिक बेपत्ता आहे. या ठिकाणच्या अपादग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने करण्याचा निर्णय सरकारने घेतला हाेता.
जुना मुंबई महामार्गावरील मानिवली येथे सरकारची 27.34.10 हेक्टर आर गुरचरण जमीन आहे. पैकी 2-60.00 हेक्टर आर जमीन इर्शालवाडीच्या पुनर्वसनासाठी देण्याचे निर्देश सरकारने 2 ऑगस्ट 2023 रोजीच्या जीआरने दिले हाेते. सदरची जमीन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यानंतर आज एमएसआरडीसीने रेखांकनास मंजूरी दिली आहे. त्यामुळे अपादग्रस्तांच्या जागेचा प्रश्न निकाली निघून पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे.