। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या पगाराबाबत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षकांच्या पगाराची रक्कम केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून वसूल केली जात आहे. संबंधित शिक्षक व मुख्याध्यापक यांचा या प्रक्रियेशी प्रत्यक्ष संबंध नसतानाही त्यांच्याकडून सक्तीने वसुली होत असल्याचा आरोप शिक्षक सेना शाखेने केला आहे. शालार्थ वेतन प्रणालीत मुख्याध्यापक स्वतः आपले वेतन डीडीओ वन पातळीवर सादर करतात. तर, डीडीओ टू स्तरावरील वेतन देयक प्रक्रिय गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत केली जाते. या प्रक्रियेत केंद्रप्रमुखांचा कोणताही अधिकृत सहभाग नसतानाही काही केंद्रप्रमुख वसुली अधिकाराच्या भूमिकेतून सक्तीने 5 रुपये दरमहा वसूल करत आहेत, असा आरोप शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष राहुल तुळशीराम गायकवाड यांनी केला आहे.