इंधन दरवाढीचा सिलसिला सुरुच


नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. बुधवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 19 पैशांची वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. गेल्या महिन्याच्या 4 तारखेपासून आतापर्यंत 22 व्या वेळी पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. ही वाढ 5.15 रुपये इतकी आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 101.71 रुपये तर डिझेलची किंमत 93.77 रुपये इतकी आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत ही 95.56 रुपये तर डिझेलची किंमत 86.47 रुपये इतकी आहे. महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि लड्डाख या सहा ठिकाणी पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्‍चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि देशातील पेट्रोलच्या किंमतीत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली.

Exit mobile version