देशातील कारभार हा केंद्र सरकारने दिलेल्या निधीवर चालत आहे हे लोकांना हे सांगितलं पाहिजे असंही दानवे म्हणाले
। मुंबई । वृत्तसंस्था ।
इंधनाचे दर हे अमेरिका ठरते त्यामुळे केंद्र सरकारला दोषी ठरवणं चुकीचं आहे, असं मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे. वाढत्या इंधनदरांसाठी केंद्राला दोषी ठरवणं अयोग्य असल्याचं दानवे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमामध्ये म्हटलं आहे.
केंद्र सरकारने याच महिन्याच्या सुरुवातीला इंधनावरील कर कमी केला होता अशी आठवण दानवे यांनी करुन दिलीय. मात्र त्याचवेळी भाजपाची सत्ता नसणार्या महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांनी व्हॅट कमी केलेला करुन सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा दिलेला नाही, असंही दानवे म्हणाले आहेत. रविवारी रात्री एका कार्यक्रमामध्ये बोलताना इंधनाचे दर हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार ठरवले जातात असा युक्तीवाद दानवेंनी केलाय. औरंगाबादमधील भाजपाच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी दानवे बोलत होते. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.