महिला दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम

। अलिबाग । वार्ताहर ।
आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अलिबाग शहरामध्ये विविध संस्था आणि मंडळांतर्फे महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी चर्चासत्र, महिला सत्कार, व्याख्यान असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशेअर, रोट्रॅक्टर्स क्लब अलिबाग, आयएमए अलिबाग, लायन्स क्लब अलिबाग, लायन्स क्लब श्रीबाग व पीनएनपी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मुली व महिलांसाठी दोन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि.8) संध्याकाळी 4 वा. पीएनपी नाट्यगृह अलिबाग येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमाला डॉ. चंद्रकांत वाजे, डॉ.ओजस्विनी कोतेकर, डॉ. मेघा घाटे, डॉ. पुष्पलता शिंदे, डॉ. राजश्री चांदोरकर, अनघा साडविलकर, आदिती गोखले, डॉ. पुनम नाईक व अ‍ॅड. अदिती चांदोरकर सहभागी होणार आहेत.

तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र, जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबाग आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रिया आणि लोकशाही या विषयावर लोकशाही गप्पा भाग 5 होणार आहे. या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी, प्रयोगशील शिक्षक पाटील, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख, प्राध्यापक डॉ. श्याम पाखरे, पत्रकार जयंत धुळप, सामाजिक कार्यकर्ते डॉ. दीपक पवार या सर्व वक्त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. व ज्येष्ठ नागरीक संस्था अलिबाग यांच्या तर्फे कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या महिलांचा सत्कार समारंभ ज्येष्ठ नागरीक भवन अलिबाग, अ‍ॅड.शिरीष लेले यांच्या प्रांगणात दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे.

Exit mobile version