| कर्जत | वार्ताहर |
नेरळ प्राधिकरण अंतर्गत येणार्या ममदापूर येथील कब्रस्थान संरक्षण भिंत बांधणे याकरिता 38.90 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. नेरळ प्राधिकरण हद्दीतील मौजे ममदापुर येथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम वस्ती असून, तेथील नागरिकांची वारंवार कब्रस्थानसाठी संरक्षण भिंत व्हावी ही मागणी करण्यात येत होती. सर्व घटकाला समान न्याय देणारे तसेच समाजाचा विकास व्हावा या दृष्टीने प्रयत्न करणारे राजिप उपाध्यक्ष यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ममदापूर येथे कब्रस्थान संरक्षण भिंत बांधण्यासाठी 38.90 लाखांचा निधी मंजूर केला आहे. कामाचे भूमीपूजन रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रा.जि.प. माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, बंधू देशमुख, दामतचे सरपंच जबिरभाई नजे, महिलाध्यक्षा अॅड.रंजना धुळे, दामतच्या उपसरपंच नयना आखाडे, वदपच्या माजी उपसरपंच मनीषा पाटील, कविता शिंगवा, वीरेंद्र जाधव, प्रसाद भोपतराव, इम्तियाज पौंजेकर आदी उपस्थित होते.
ममदापूर येथील कब्रस्थानच्या संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर
