…अन गाभारा पाण्याने भरला

। म्हसळा । प्रतिनिधी ।
बराच काळ पाऊस पडला नाही तर लोक शंकराला गार्‍हाणे घालून पाऊस मागतात. त्याही पुढे जाऊन भजन, कीर्तन करीत शंकर मंदिरातील गाभारा भरला जातो. परंतु, मुसळधार पाऊस कोसळत असताना म्हसळा येथील स्वयंभू लखमेश्‍वर शिवमंदिरातील गाभारा आपोआप पाण्याने भरला. यामुळे येणारे सर्वच भाविक आश्‍चर्यचकीत झाले. ही बातमी वार्‍यासारखी पसरली आणि भाविकांची दर्शनासाठी मंदिरात गर्दी झाली. 50-55 वर्षांपूर्वी असाच प्रसंग घडला होता, असे काही भाविकांकडून सांगण्यात आले.

Exit mobile version