गडब मॅरेथॉन कृतज्ञाने जिंकली

। गडब । वार्ताहर ।

‘एक धाव सशक्त गडब’साठी आयोजित महिला मॅरेथॉन स्पर्धेत कृतज्ञा चवरकरने विजेतेपद मिळविले.

प्रिझम जॉन्सन कंपनीच्या आवारात घेण्यात आलेल्या ‘एक धाव गडब’साठी मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक कृतज्ञा चवरकर, द्वितीय आचल ठाकूर, तृतीय साक्षी पाटील, चतुर्थ नेहा मोकल यांनी मिळविले.

या स्पर्धेचे उद्घाटन व परितोषक वितरण जि.प.चे माजी सदस्य संजय जांभळे, गडब कारावच्या नवनिर्वाचित सरपंच मानसी पाटील, उपसरपंच मनोज पाटील, सदस्य मनोहर पाटील, दीपक कोठेकर, जगदीश कोठेकर, दिनेश म्हात्रे, भाग्यश्री कडू, सीता पाटील, कीर्ती म्हात्रे, संध्या म्हात्रे, वैशाली म्हात्रे, दिपाली भोईर, मुक्ता वाघमारे, मंगेश पाटील, संतोष म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, अभिजित पाटील, देविदास कोठेकर, मोरेश्‍वर कडू आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रिझम जॉन्सन कंपनीचे अधिकारी, ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version