करंजाडेत स्वच्छतेसाठी गांधीगिरी

सामाजिक संस्थांच्या सहकार्याने साफसफाई
परिसरातील रस्ते केले कचारामुक्त
पनवेल | वार्ताहर |
गांधी जयंतीनिमित्त करंजाडे येथील सरपंच आणि सामाजिक संस्थायांच्या सहकार्याने शनिवार, ता. 2 ऑक्टोबर रोजी करंजाडे गाव व वसाहत परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यानिमित्ताने परिसरातील साफसफाई करून रस्ते कचरामुक्त करण्यात आले.
अहिंसा, सत्याबरोबर स्वच्छतेची शिकवण देणार्‍या महात्मा गांधी यांचा आपला परिसर स्वच्छ ठेवण्यावर विशेष कटाक्ष होता. देशभरात 2 आँक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान ठिकठिकाणी घेण्यात आले. करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्‍वर आंग्रे यांनी याकरीता पुढाकार घेतला.
या मोहिमेत जेष्ठ नागरिक संस्था, करंजाडे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास मंडळ, करंजाडे फ्लॅट ओनर्स वेलफेअर असोसिएशन, सिरवी समाज सेवा संस्था, श्री सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास मंडळ, गावदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दक्षराज सामाजिक विकास मंडळ, प्रबुद्ध सामाजिक संस्था, साकार अकॅडमी, नवतरुण मित्र मंडळ करंजाडे बौद्धवाडा, ज्येष्ठ नागरिक, गणेश मित्र मंडळ गणेशनगर करंजाडे, महिला बचत गट, आंगणवाडी शिक्षिका व मदतनीस, डॉक्टर, मेडिकल असोसिएशन, व्यापारी वर्ग, रिक्षा चालक मालक संघटना, सफाई कर्मचारी, महिला मंडळ युवक मंडळ सामाजिक संस्था, नागरिक व भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

कापडी पिशव्या हाती घेत प्लास्टिकमुक्तीचे व्रत
करंजाडे वसाहतीमध्ये ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, महिला मंडळ यांनी प्लास्टिकमुक्तीची चळवळ अधिक गतिमान व व्यापक सुरु केली आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी जयंतीचे औचीत्त्य साधत सिरवी समाज सेवा संस्थाच्या वतीने कापडी पिशव्या मोफत वाटण्यात आल्या. यावेळी प्लास्टिकमुक्तीसाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा, शिरवी समाज संस्था व सरपंच रामेश्‍वर आंग्रे यांनी आवाहन केले.

माझी प्लास्टिक माझी जबाबदारी
प्लास्टिक रिसायकलची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, आपला घरचा प्लास्टिक जमा करून तो प्लास्टिक रिसायकल सेंटरवर घेऊन जाणे यासाठी करंजाडे येथील सई पवार यांच्यासह महिलांनी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. यावेळी या मोहिमेमध्ये पनवेल वेस्ट आर्गोनायशेने देखील सहभाग घेऊन प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यात आला. यावेळी प्राजक्ता सहा यांनी या महिमेची माहिती दिली. या माझी प्लास्टिक माझी जबाबदारी या मोहिमेमध्ये सई पवार, अंजली मानपुरे, प्रतीक्षा लांगी, कविता कदम, रेशमा मोरे, ऋतुजा महामुनी, आशा खेडेकर, मिथू लांडगे यांनी प्लास्टिक मुक्तीचा संकल्प केला आहे.

स्वच्छ करंजाडे, सुंदर करंजाडे ही संकल्पना राबवून भविष्यात रोगराई पसरली जाते ती कशी कमी होईल याकडे लक्ष ठेवणार आहोत. सिडको प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सिडकोला या वसाहतीमध्ये स्वच्छतेची गरज असल्याचे लक्षात आणून दिले आहे. या मोहिमेला सामाजिक संस्थानी सहकार्य केले आहे.
रामेश्‍वर आंग्रे, सरपंच

Exit mobile version