| आपटा | प्रतिनिधी |
लाडीवली येथील गणेश पांडुरंग शिर्के हे लोना इंडस्ट्रीज लि. लाडीवली या कंपनीत गेली 17 वर्षांपासून प्रोडक्शन विभागात काम करत आहेत. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे आठवड्यातून दोन वेळा डायलिसिसला जावे लागत आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापन व कारखाने निरीक्षक रायगड यांना तोंडी व लेखी पत्र पाठवून वैद्यकीय मदत मागितली असून कोणतीही मदत मिळाली नाही. याविरोधात पांडुरंग शिर्के यांनी कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. सोमवार, दि. 1 डिसेंबर रोजी ते उपोषणास बसणार असल्याचे कंपनी व्यवस्थापन व संबंधित प्रशासनाला कळविले आहे.
गणेश शिर्केंचा उपोषणाचा इशारा
