| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर महागणपती क्षेत्रात संकष्टी चतुर्थीनिमित्ताने शनिवारी गणेशभक्तांनी प्राचीन महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनाला सुरुवात झाली होती. मात्र, यावेळी चिरनेर परिसरातील गावागावात साखर चौथीच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आल्यामुळे, गणेश मंदिरात महागणपतीच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची फारशी गर्दी दिसून आली नाही. चिरनेर येथील गणपती मंदिर हे हेमाडपंथीय धाटणीचे दिसून येते. हे गणपती देवस्थान अत्यंत जागृत असून, या ठिकाणी आलेल्या भक्तांची दुःखे निश्चित दूर होतात, अशी गणेशभक्तांची श्रद्धा आहे.