| नाशिक | प्रतिनिधी |
नाशिकच्या पंचवटी परिसरात एका वीस वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेवर अत्याचार करणारा आरोपी तिचा नातेवाईक आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आरोपींनी तिच्या पतीला जामीन देऊन सोडवण्याचे आमिष दाखवले. पीडितेला शेतावर नेले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. आरोपींनी मिळून तिला मारहाण देखील केली. त्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात अत्याचार आणि मारहाण झाल्याची तक्रार केली. त्या आरोपीनेच पीडितेला आमिष दाखवत शेतामध्ये नेले होते. दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याअंतर्गत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर फरार असलेल्या एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.