नेरळ ग्रा.पं. कर्मचार्यांची मनमानी
| नेरळ | वार्ताहर |
नेरळसारख्या मोठ्या लोकवस्तीच्या आणि शहरीकरणाकडे झुकलेल्या गावात कचरा ही मोठी समस्या बनली आहे. याठिकाणी अद्याप कचरा डेपोची जागा निश्चित झालेली नाही. दुसरीकडे ग्रामपंचायत कमर्चार्यांना वाटेल त्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. दरम्यान, नेरळ गावाची शान समजल्या जाणार्या गणेश घाटाच्या खाली आता नवीन कचरा डेपो बनविण्यात आला आहे. नेरळमध्ये झालेल्या नागरीकरणाबरोबर अन्य समस्यादेखील मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. त्यात नेरळमधील साठून राहणार कचरा आणि त्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राऊंड उभारण्याची मागणी आहे. त्यासाठी जागादेखील निश्चित करण्यात आली आहे. परंतु, आठ वर्षांत नेरळ ग्रामपंचायत त्या ठिकाणी कचरा डेपो हलवू शकली नाही. कल्याण- कर्जत मार्गावर असलेल्या जुन्या कचरा डेपोमुळे तेथील नाला अर्धा त्या कचर्याने गिळंकृत केला आहे. दरवर्षी पावसात त्या नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याबरोबर जुना कचरा वाहून जात असतो आणि पुन्हा त्या ठिकाणी नवीन कचरा पाण्यासोबत वाहून गेलेलया कचर्यातून अधिक प्रमाणात आणून टाकला जातो. त्यामुळे कचरा डेपो अभावी नेरळ गावातील जुना कचरा डेपो भरून वाहू लागल्याने आरोग्य विभागाने नवीन कचरा डेपो निर्माण केला आहे. आता मोहाचीवाडी रस्त्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या खाली ग्रामपरचायत कर्मचारी कचरा नेऊन टाकत आहेत. त्या पुलाच्या बाजूने मोहचीवाडी तसेच काही आदिवासी वाद्यांना जाणारा रस्ता असून तेथून प्रवास करताना तोंडावर रुमाल लावून लोकांना जावे लागत आहे. या नव्याने निर्माण झालेल्या कचरा डेपो मुळे नेरळ ग्रामपन्चायत मधील ग्रामस्थ दुर्गंधी पसरलेल्या रस्त्याने प्रवास करीत आहेत. त्या नव्याने तयार झालेल्या कचरा डेपोमुळे नेरळ मधील पर्यटनाचे ठिकाण म्हणून समजल्या जाणार्या गणेश घाट आणि ब्रिटिशकालीन धरण येथील पर्यटन थांबले आहे. आता नव्याने धरणाजवळील नवीन पुलाच्या खाली कचरा टाकला जात आहे त्यास आम्ही दोन सदस्यांनी विरोध केला होता. त्याचे कारण पलीकडील भागात मोठ्या प्रमाणात राहणारे आदिवासी लोक आणि परिसरातील शाळेचे विद्यार्थी यांना त्या दुर्गंधीमुळे त्रास होत आहे.त्याचेवेळी स्मशानभूमी येथे येणारी मंडळी यांना देखील मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तेथील कचरा तात्काळ उचलावा, अशी मागणी आहे.