। मुंबई । प्रतिनिधी ।
उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीची तयारी केली आहे. यावेळी, त्यांनी कार्यकर्त्यांना सक्त ताकीद दिली आहे. संकटाच्या वेळी पक्षाला ब्लॅकमेल करणे योग्य नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच, ज्याला जायचे असेल त्याने जावे, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मातोश्रीवर ठाकरे गटाचे आमदार आणि अधिकार्यांच्या बैठकीत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अनेक नेत्यांनी त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले नसल्याचे सांगितले होते. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेण्यात आले नाही, असे एका नगरसेवकाने सांगितले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मोठ्या विजयानंतर ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक पक्ष बदलण्याच्या विचारात आहेत. पक्षातील नाराजीबद्दल आवाज उठवणार्या आजी-माजी नगरसेवक आणि अधिकार्यांसमोर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.