सूरत । वृत्तसंस्था ।
गुजरातमधील सूरतमध्ये गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. विश्व प्रेम डाईंग अॅण्ड प्रिटिंग मिलजवळ एका टँकरमधून गॅस गळती झाल्याने मिलमधील चार कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे. गुदमरल्यामुळे या कर्मचार्यांचा मृत्यू झाला. दरम्यान 25 हून अधिक जणांची प्रकृती गंभीर आहे. पहाटे प्रिटिंग मिलमध्ये झालेल्या या दुर्घटनेनंत खळबळ माजली आहे. मिलजवळ असलेल्या नाल्यात एका अज्ञात टँकरचा चालक विषारी केमिकल टाकत होता. यावेळी विषारी वायूची गळती होऊ लागली. जवळच असणारे मिलमधील कर्मचाऱी या विषारी वायूच्या संपर्कात आले.