| पनवेल । वार्ताहर ।
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथे मंगळवारी (ता. 20) सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल, मुंबई-पुणे महामार्ग, गांधी हॉस्पिटलसमोर, पनवेल या ठिकाणी बेरोजगारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा होणार असल्याची माहिती सहायक आयुक्त अ. मु. पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील 467 पेक्षा जास्त रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा होणार आहे. रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांची माहिती www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीकरिता या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02141-222029 वर संपर्क साधावा. या रोजगार मेळाव्यात एस.एस.सी.पास, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, फार्मासिस्टसाठी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. त्यामुळे विनामूल्य होणार्या रोजगार मेळाव्याला नोकरी इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.