| पनवेल | प्रतिनिधी |
ओरियन मॉलमधील रिलायन्स स्मार्ट बाजारातून विविध कंपनीच्या तुपाच्या तब्बल 104 पिशव्या चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार महिलांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या स्मार्ट बाजारात काम करणारे मुकुल बिस्ट यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार, डायनामिक्स, अमूल, गोवर्धन आणि इतर कंपनीच्या तुपाच्या एकूण 104 पिशव्या चोरीला गेल्या असून, त्यांची किंमत 53 हजार 711 रुपये आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
रिलायन्समधून तुपाच्या पिशव्या लंपास
