विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी वेंडीग मशीन भेट

| नागोठणे | वार्ताहर |
जागतिक महिला दिन तसेच शिक्षण ज्योती सावित्रीमाई फुले यांचा स्मृतीदिन याचबरोबर नागोठणे येथील सर्वात कमी कालावधीत नावारूपाला आलेल्या नीव सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या होली एंजल्स स्कुलच्या संस्थापिका कै. सीमा मुल्कवाड यांचा जन्म दिवस अशा त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून लायन्स क्लब नागोठणे यांच्या माध्यमातून होली एंजल्स स्कूलमधील विद्यार्थिनींसाठी लायन पांडुरंग शिंदे यांच्या सहकार्याने सॅनिटरी नॅपकीन पॅड वेंडीग मशीन भेट देण्यात आली.

नागोठणे शहर व परिसरात सातत्याने सर्व सामान्यांसाठी वेगवेगळ्या स्तरावर लोकाभिमुख उपक्रम राबवित सामाजिक बांधिलकी जपणारी लायन्स क्लब संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध कार्यालये, स्कूल, कॉलेज, आयटीआय अशा विविध ठिकाणी या सॅनिटरी नॅपकीन पॅड वेंडीग मशीन भेट स्वरूपात देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून लायन्स क्लब नागोठणे यांच्या माध्यमातून लायन पांडुरंग शिंदे यांच्या सहकार्याने होली एंजल्स स्कूलमधील विद्यार्थिनींसाठी ही सॅनिटरी नॅपकीन पॅड वेंडीग मशीन भेट स्वरूपात देण्यात आली.

याप्रसंगी लायन्स क्लबचे सेक्रेटरी लायन विवेक सुभेकर, चार्टड प्रेसिडंट ला. प्रकाश जैन, लायन दौलत मोदी, ला. विलास चौलकर, ला. दिपक गायकवाड, ला. अंजली सावंत, ला. लेडी व जोगेश्‍वरी पतसंस्थेच्या संचालिका दिपीका गायकवाड यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Exit mobile version