अलिबाग कारागृहाला भांड्यांची भेट

| अलिबाग | वृत्तसंस्था |

सावतामाळी, जयभवानी, ग्लोबल केअर फाऊंडेशन यांच्यावतीने अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांचे जेवण बनविण्यासाठी भांडी भेट दिली. न्यायाधीश जे.एस.कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली कारागृहास भांडी देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये सावतामाळी पतसंस्थेकडून 3 नग पातेली, जयभवानी पतसंस्थेकडून लाकडी कपाट 1 नग तसेच ग्लोबल केअर फाऊंडेशन मुंबई यांच्याकडून बंद्यांचे जेवण गरम राहण्याकरिता 6 नग भेट दिले आहे. यावेळी कारागृह अधीक्षक अशोक कारकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी रामचंद्र रणनवरे, तुरुंगाधिकारी शशिकांत निकम, सावतामाळी पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश नाईक, उपाध्यक्ष जे.पी कवळे, ग्लोबल केअर फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष आबीद अहमद कुंदालम व जयभवानी पतसंस्थेचे जयेश सुतार आदी उपस्थित होते.

Exit mobile version