वॉटर कुलरची भेट

। उरण । वार्ताहर ।

रायगड जिल्हा परिषद शाळा विंधणे येथील सन 1989 -1990 सालच्या इयत्ता सातवीच्या बॅचने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेला वॉटर कुलर दिला. शाळेतील मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही फार उपयोगी वस्तू दिल्याबद्दल सर्व शिक्षक वर्ग व शालेय व्यवस्थापन कमिटीने या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील उपशिक्षक गोवारी यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना विं.दा. करंदीकर यांच्या प्रसिद्ध ओळींनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. तदनंतर उपस्थित माजी विद्यार्थ्यांपैकी विद्या म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बालपणीच्या सर्व आठवणींना उजाळा देऊन सर्व विद्यार्थी मित्रांना अगदी बालपणात घेऊन गेल्या. तसेच शास्त्रज्ञ अरिस्टॉटल ह्यांच्या आई ही मुलाची प्रथम गुरु असते; तर शाळा ही मुलाची दुसरी आई असते अशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या. सदर भेट वस्तूची रक्कम जमा करण्यासाठी प्रविण पाटील, विद्या म्हात्रे, विलास नवाळी, प्रकाश घरत, राजश्री नाईक, अजित पाटील, गोरखनाथ पाटील वनिता घरत, मंजूळा घरत, गणेश ठाकूर, जीवन पाटील, कांतीलाल पाटील, संतोष पाटील, प्रकाश घरत, रघुनाथ पाटील, सुगंधा भोईर, अंजना थळी, मिलिंद पाटील, विनोद पाटील आदींनी खारीचा वाटा उचलला.

Exit mobile version