नेरळला नवीन पादचारी पुलावर गर्डर

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ रेल्वे स्थानकातील मुंबई दिशेकडे बांधण्यात येत असलेली पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम मध्य रेल्वे अभियांत्रिकी विभाग यांच्याकडून टाकण्यात आले. मध्य रेल्वे प्रशासनाने गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी रविवारी (19 फेब्रुवारी) पहाटे मेगा ब्लॉक घेतला होता.

मध्य रेल्वे मेन लाईन वरील कर्जत दिशेकडे असलेल्या नेरळ रेल्वे स्थानकात मुंबईकडे नवीन पदाचारी पुल बांधण्यात येत आहे. या पादचारी पुलाचे फलाट एक आणि फलाट दोन वर तसेच पश्‍चिम बाजूकडे उतरण्यासाठी आणखी एक जिना उभारण्यासाठी असे एकूण तीन खांब उभे राहिले आहेत. त्या पुलाचे काम लवकरात लवकर करून प्रवाशांच्या सेवेत हे पादचारी पूल देण्यासाठी पुलावर मेन लाईन वर गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी पहाटे मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मध्य रात्री अडीचच्या सुमारास दोन तासाचा मेगा ब्लॉक घेवून नेरळ येथील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम आणि बदलापूर येथील डी लिचींगची कामे करण्यात आली. या मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील तीन एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले होते.

या मेगाब्लॉक मुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतसाठी 00.24 वाजता सुटणारी लोकल अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली. तसेच कर्जत येथून 02.33 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी लोकल अंबरनाथ येथून चालविण्यात आल्या आहेत. अप मार्गावरील 11020 भुवनेश्‍वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस,12702 हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस,18519 विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाड्या कर्जत-पनवेल-दिवा मार्गे वळवण्यात आल्या. दरम्यान, मध्य रात्री आणि पहाटेची वेळ असल्याने नेरळ स्थानकात या मेगा ब्लॉक च कोणताही परिणाम जाणवला नाही.

Exit mobile version