गडचिरोलीतील मेडीगड्डा धरणग्रस्त शेतकर्‍यांना न्याय द्या

आ.जयंत पाटील यांची मागणी
| नागपूर | प्रतिनिधी |
नक्षलग्रस्त गड़चिरोली जिल्हयातील सिरोंचा तालुक्यातील मेडीगड्डा धरणग्रस्त शेतकरी मागील चार वर्षे मोबदला मिळावा याकरिता विविध 12 गावातील शेतकरी सिरोंचा तहसिस कार्यालया पुढे गेल्या 35 दिवसांपासून साखळी उपोषण करित आहेत. त्यांच्या मागण्या सरकारने मंजूर कराव्यात,अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी केली.

विधानपरिषदेत बोलताना ते म्हणाले की, या शेतकर्‍यांच्या उपोषणाची दखल घेऊन मी दोन दिवस त्या ठिकाणी वास्तव्य करुन होतो. 12 गावातील हे शेतकरी मेडीगड्डा धरणामुळे बाधित झाले आहेत. न दरवर्षी येणार्‍या पुरामुळे त्यांच्या शेतीत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे . मेडीगड्डा धरणाच्या उभारणी वेळेस धरण क्षेत्रात येणारी 373.80 हेक्टर जमीन अधिगृहित करण्यात आली होती. त्यापैकी 138.91 हेक्टर अधिगृहित जमीनीची भुसंपादन प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही . त्यामुळे सरकारने रखडलेली भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून शेतकर्याना योग्य मोबदला द्यावा ,प्रकल्पग्रस्तांच्या नावांची नोंदणीी करण्यात यावी,अशी मागणीही त्यांनी केली.

यावर उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील म्हणाले की कालेश्‍वरम मेडीगड्डा बेरेज प्रकल्प महाराष्ट्र व तेलगंणा या दोन्ही राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे .सदर प्रकल्पा वरील होणारा खर्च हा तेलगंणा राज्य करीत आहे. सदर सिंचन प्रकल्पा करीता आवश्यक असलेली जमीन भूसंपादन थेट खरेदी धोरणानुसार याबाबचा निर्णय घेण्याचा अधिकार अधिग्रहण संस्था म्हणून कार्यकारी अभियंता ,मेडीगड्डा बेरेज ,तेलगंणा यांना आहे . भूसंपादन अधिनियमानुसार प्रक्रिया सुरु होउन ती अंतिम टप्यात आहे . त्यामुळे यापूर्वी थेट खरेदीने ताब्यात घेतलेल्या 234.92 हेक्टर आर जमीनीला देण्यात आलेले मूल्यांकन विचारात घेऊन उर्वरित बुड़ित क्षेत्र 128.04 हेक्टर आर करीता कलम 23 (क)मधील तरतुदीनुसार संमती निवाडा करून भुधारकास वाज़वी व न्याय मोबद्ला देण्याची तजवीज ठेवण्यात येत आहे .अस हि महसूल मंत्र्यांनी आपल्या उत्तरात सांगितल.

चौसाळा येथील मांजरा नदीवर पूल उभारा
चौसाळा (जि. बीड) येथील पाच कि.मी. अंतरावर असलेल्या मांजरा नदीवर तातडीने पूल उभारला जावा,अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे केली आहे. नदीवर पूल नसल्यामुळे मुंडे वस्ती आणि आंधळे वस्तीतील लहान मुलांना, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, रूग्णांना तसेच दैनंदिन कामकाजासाठी ग्रामस्थांना हिंगणी खुर्दमध्ये ये-जा करण्यासाठी बाराही महिने नदीच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो,शिवाय दरवर्षी पावसाळ्यात मुंडे वस्ती व आंधळे वस्ती येथे राहणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांना हिंगणी व चौसाळा येथे तसेच शेतकर्‍यांना शेतात तीन ते चार महिने जाता येत नाही,असेही निदर्शनास आणले. (3) असल्यास, शासनाने मुंडे वस्ती व आंधळे वस्ती येथील विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना सोयीस्कर प्रवास करण्यासाठी मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,अशी विचारणा करण्यात आली.

या प्रश्‍नावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सदर ठिकाणी मांजरा नदीवर नवीन पूल बांधणे आवश्यक असून सदर पूलाचे काम नवीन पूल बांधकामाच्या योजनांमध्ये (उदा, नाबार्ड, जिल्हा वार्षिक योजना, इ.) प्रस्तावित करण्याबाबतच्या सूचना जिल्हा परिषदेस देण्यात आलेल्या आहेत. निधीच्या उपलब्धतेनुसार सदर काम हाती घेण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे.अशी माहिती दिली आहे.

Exit mobile version