| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
गोध्रा ट्रेन हत्याकांड प्रकरणी गोध्रा न्यायालयानं एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयान आरोपी रफिक भाटुक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. भाटुकला फेब्रुवारी 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी अटक झाल्यानंतर या प्रकरणी त्याच्याविरुद्ध खटला सुरू झाला. भाटुक हा या प्रकरणातील आतापर्यंतचा 35 वा आरोपी असून, त्याच्यावर न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला आहे.
गोध्रा हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप
