राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत रायगडच्या शिलेदारांची सुवर्ण कामगिरी

| पाली/बेणसे । वार्ताहर ।

36 व्या राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. रायगडच्या शिलेदारांनी अत्यंत दमदार व सुवर्ण कामगिरी केली आहे.

गुजरात गांधीनगरमध्ये झालेल्या राष्ट्रीय 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महिला संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र राज्याचे नाव भारत देशामध्ये उमटविला आहे. पुरुषाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवून महाराष्ट्र राज्याचे नाव भारत देशामध्ये उमटविला आहे. या दैदिप्यमान कामगिरीने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

महिला संघाचे नेतृत्व करणारी संघ नायिका कोमल कर्वे रिलायन्स आयपीसीएल जलतरण तलावर अनेक वर्ष सराव करून महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची तिला संधी मिळाली. त्या संधीचा संघातील सहकार्यांना हाताशी घेऊन तिने महाराष्ट्र राज्याला नॅशनल गेममध्ये सुवर्णपदक मिळून दिले आहे. अंतिम सामन्यामध्ये तिने तीन गोल मारून महाराष्ट्र राज्याला सुवर्णपदक मिळून दिलेला आहे.

महाराष्ट्र पुरुष संघाचे नेतृत्व करणारा अक्षय जनार्दन कुंडे हा सुद्धा खूप चांगला खेळाडू त्याने अनेक वेळा रायगड संघाला सुवर्ण पदक मिळून दिले आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दत्ता तरे यांनी या सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविले आहेत. महाराष्ट्र संघाला आजवर तरे यांनी अनेक आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळाडू तयार करून दिलेले आहेत.

Exit mobile version