| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात तब्बल 22 शहरांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्यावर नोंदवला गेला आहे. तर, विदर्भात सूर्य आग ओकत आहे. दरम्यान, आता हवामान विभागाकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा मान्सून 15 दिवस लवकर दाखल होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश भागात उष्णतेची लाट असताना मान्सूनबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा मान्सून लवकर येण्याचा अंदाज वर्तवला आहे. दि.15 ते 25 मे पर्यंत अंदमानात, तर 25 मे पर्यंत केरळात दाखल होणार आहे. हिंदी महासागरातील अनुकूल बदलामुळे आणि अल निनोचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.






