जेएनपीएत कोट्यवधींचा माल रखडला

| उरण | प्रतिनिधी |

इराण-इस्रायल संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनी आणि लाल समुद्रातील धोका वाढल्याने मालवाहू जहाजांचे मार्ग बदलले आहेत. आखाती देशांमधील या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून, कोट्यवधी रुपयांचा माल जेएनपीए बंदरात अडकला आहे. जेएनपीए बंदरात अडकलेल्या सुमारे 1200 कंटेनर्समधील मालाची एकूण किंमत 250 ते 300 कोटींच्या आसपास असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या कंटेनर्समध्ये नाशवंत माल असून त्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जेएनपीए बंदराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कंटेनर्समध्ये कांदा, द्राक्षे आणि केळी या शेतीमालाचा समावेश आहे.

Exit mobile version