प्राथमिक शाळेत गोपाळकाला उत्साहात

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातत्याने विधायक, विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवित असते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर आणि शिक्षक इंदिरा चौधरी, जयश्री गायकवाड, उमदी नेहमीच विद्यार्थ्यांना शिस्तप्रिय वागणूक, संस्काराचे धडे तसेच सण, उत्सावाच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीची आठवण करून देत असतात. जन्माष्ठमी निमित्त सोमवारी (दि.4) विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्व सांगून गोपाळकाला उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.

Exit mobile version