शासनाची चार लाखांची मदत

। खरोशी । प्रतिनिधी ।

वादळी वार्‍याच्या पावसात झाडाची फांदी कोसळून पेण तालुक्यातील नाईकवाडी येथील यश चंद्रकांत नाईक (17) यांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. शासन स्तरावर या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी मंगेश दळवी, रुपेश दळवी यांनी पाठपुरावा करत, या कुटुंबांना चार लाख रुपयांची मदत मिळवून दिली. यावेळी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, पेणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्यासोबत मंगेश दळवी, रुपेश दळवी, सरपंच गजानन मोरे, सुरेश पवार, दत्ता पवार, स्नेहल पाटील, महेश भोईर, हरेश दळवी, जनार्दन वारगुडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version