| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठी कारवाई केली आहे. मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर (मसरत आलम ग्रुप) नंतर तहरीक-ए-हुर्रियतवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा केली आहे. तहरीक-ए-हुर्रियत या संघटनेवर दहशतवादी कारवायांमुळे युएपीए कायद्यांतर्गत बंदी घालण्यात आली आहे.
ही संघटना जम्मू आणि काश्मीर भारतापासून वेगळे करण्यासाठी आणि इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्यासाठीच्या प्रतिबंधीत कारवायांमध्ये सहभागी आहे. जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला चालना देण्यासाठी भारतविरोधी प्रचार करत आहे. तसेच, भारतविरोधात दहशतवादी कारवाया करत आहे. नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण आखले आहे. यामुळे या संघटनेवर कारवाई करण्यात येत असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. यापूर्वी 27 डिसेंबर रोजी गृह मंत्रालयाने मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर (मसरत आलम ग्रुप) वर बंदी घातली होती. 5 वर्षांसाठी ही बंदी घालण्यात आली होती.