उद्यापासून राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर

| मुंबई | वृत्तसंस्था |
राज्यातले 18 लाख सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी 23 आणि 24 फेब्रवारीला संपावर जाणार आहेत. निवृत्तीचे वय 60 वर्षे तसेच इतर मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर जात आहेत.
राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने हा संप पुकारला आहे. या संपाला राजपत्रित अधिकारी महासंघाचा पाठिंबा आहे, पण गॅझेटेड ऑफिसर्स या संपात सहभागी होणार नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी कर्मचार्‍यांची संपाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. या बैठकीला केवळ अधिकरी आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांचेच पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. कर्मचारी संपात हा फूट पाडण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप संघटनांनी केला आहे. कर्मचार्‍यांनी संपावर जाऊ नये, असे राज्य सरकारने आवाहन केले आहे.

Exit mobile version