| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाने मागील 3 वर्षांपासून प्रलंबित ठेवलेल्या सुधारित पेन्शन योजनेची अंमलबजावणी सुरु करावी तसेच, इतर 18 मागण्यासाठी संप पुकारण्यात आला होता. मुख्य सचिवांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीनंतर लेखी स्वरूपात इतिवृत्त संघटनेला दिल्यामुळे तसेच येत्या 15 दिवसांत सुधारीत पेन्शन योजनेबाबत शासन निर्णय जारी करणार असल्याबाबत अश्वस्त करण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी 21 एप्रिलपासून सुरु केलेला बेमुदत संप शनिवारी (दि.25) पासून स्थागित करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
सर्व घटक संघटना आणि सुकाणू समितीच्या शुक्रवारी ( दि.24) सायंकाळी झालेल्या आभासी सभेमध्ये संप स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे. त्या मुळे समन्वय समितीचे महाराष्ट्र निमंत्रक विश्वास काटकर तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना राज्य अध्यक्ष अशोक दगडे यांनी विविध संघटना व सुकाणू समितीच्या पदाधिकारी यांचे मत विचारात घेऊन 25 एप्रिल 2026 पासून संप स्थागित असल्याचे घोषित केले. त्यामुळे शासकीय कार्यालयात सोमवार पासून नियमित कामकाज सुरु होईल. गेले 4 दिवस नागरिकांना झालेला त्रास व गैरसोयी बद्दल रायगड जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटना व समन्वय समितीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत सुरेश पालकर – अध्यक्ष, समन्वय समिती रायगड, संदीप नागे – अध्यक्ष कर्मचारी मध्यवर्ती संघटना, प्रभाकर नाईक – निमंत्रक समन्वय समिती यांनी माहिती दिली.
अखेर संपाला स्थगिती

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606