| आपटा | वार्ताहर |
पनवेल, पेण, उरण, कर्जत खालापूर तालुक्यात राहणार्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींसाठी युसुफ मेहेर अली सेंटरतर्फे सुरु असलेल्या वस्तीगृहाला रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्यावतीने धान्य वितरित करण्यात आले.
वस्तीगृहातील आदिवासी विद्यार्थिनीनसाठी भोजनासाठी आवश्यक असणारे पुरेसे तांदूळ, तूरडाळ, आटा, खाद्यतेल, रवा, साखर इत्यादी सुपूर्द करण्याचा कार्यक्रम तारा येथील संस्थेच्या भोजनगृहात देण्यात आले. यावेळी अमित शहा, आल्हाद पाटील, बाळकृष्ण होनावळे, मेघा कोरडे, अनुराधा होनावळे, प्रतिक्षा कुरंगळे या कार्यक्रमास उपस्थित होत्या. वस्तीगृहाच्या अधीक्षक उत्पला म्हात्रे, सेंटरचे संचालक बाळकृष्ण सावंत, अनिल विश्वकर्मा,संतोष ठाकूर हे पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते. त्यांनी या भेटीचे उत्तम नियोजन करून सेंटरच्या संपूर्ण कामाचा परिचय करून दिला.