संप मिटल्याने धान्य वितरणाला सुरुवात

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| बोर्ली पंचतन | वार्ताहर |

गेले दोन महिने हमालांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे शासनाच्या रास्त भाव धान्य दुकानातून मिळणारे धान्य वितरित करता येत नव्हते. परंतु, नुकताच हमालांचा संप मिटल्याने या दोन दिवसात धान्य पुरवठा सुरळीत होईल असेही रूपाली सुने यांनी सांगितले आहे. ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत आपली ई-केवायसी केली नसेल त्यांनी ती आपल्या शिधावाटप दुकानातून अथवा सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या वेबसाइटवर मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या त्वरित करून घ्यावी. अन्यथा आपला धान्य पुरवठा बंद होईल, असे आवाहन रूपाली सुने यांनी केले आहे.

Exit mobile version