| कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील जून 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. पोटल आणि पाली या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटल आणि पाली या दोन ग्रामपंचायतीसाठी गुरुवार दि.13 ऑक्टोबर रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे, त्यासाठी बुधवार दि. 21 सप्टेंबर ते मंगळवार दि. 27 सप्टेंबर पर्यत नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची मुदत आहे.
बुधवार दि.28 सप्टेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे, 30 सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे, 13 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे आणि 14 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. दोन्ही ग्रामपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिजीत खैरे यांची नियुक्ती केली आहे. आजपर्यंत पोटल ग्रामपंचायतीमध्ये 26 तर पाली ग्रामपंचायतीमध्ये 4 असे एकूण 30 अर्ज ऑनलाईन भरले गेले आहेत. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे एकही अर्ज दाखल झाला नाही अशी माहिती तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागातून देण्यात आली आहे.