ग्रामसुरक्षा रक्षक दलाचा पोलिसांकडून सन्मान

। म्हसळा । वार्ताहर ।
जिल्ह्यातील 25 तालुक्याची लोकसंख्या पाहता येथील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांची संख्या हि कितीतरी पटीने कमी आहे. म्हसळा तालुक्यातही अल्प असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेत पोलिसांना मदत म्हणून गाव पोलीस पाटील आणि ग्राम सुरक्षा रक्षक दलाचा सहकार्य नक्कीच मोलाचा ठरत आहे. म्हसळा पोलीस पाटील आणि ग्रामसुरक्षा रक्षक दल यांनी म्हसळा शहरात साजरे झालेले सन उत्सव त्या अनुषंगाने म्हसळा पोलिसांनी त्यांचे कामाची दखल घेऊन पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन प्रशांत स्वामी यांचे हस्ते म्हसळा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील आणि ग्रामसुरक्षा दल सैनिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनंत पाटील, अशोक नाईक, निलेश लटके, सुरेंद्र विचारे, जगन्नाथ देवरुखकर, मनिषा मोरे, दिगंबर अंजारलेकर, विकास पोटले, स्नेहा पवार, रविंद्र पवार, लक्ष्मण गाणेकर, जयदास कांबळे, नरेंद्र पदरत, शिंदे,गोविंद कांबळे आदिचा सन्मान करण्यात आला.

Exit mobile version