महाडमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन

। महाड । प्रतिनिधी ।

परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना त्यानंतर अटक करण्यात आलेल्या एका कार्यकर्त्यांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे झालेला मृत्यू आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेले वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि.24) महाडमध्ये बौध्द समाजाच्यावतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात महाड तालुका बौध्द समाजाच्या प्रमुख नेत्यांची गुरुवारी (दि.19) चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बैठक संपन्न झाली. यासभेत महाडमध्ये प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्याचे ठरवले असून हा मोर्चा सकाळी 11 वाजता चवदार तळे येथून निघेल, तो मुख्य बाजारपेठमार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version