मानिवलीत हुतात्मा स्मारकाला अभिवादन

। नेरळ 2 । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील मानिवली येथे हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे सिद्धगडावर हौतात्म्य प्राप्त झालेले हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचे स्मारक असून त्या ठिकाणी रविवारी 2 जानेवारी रोजी सिद्धगड बलिदान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले.त्यावेळी सभापती सुषमा ठाकरे, प्रांत अजित निराळे,तहसीलदार विक्रम देशमुख,माजी सभापती अमर मिसाळ, माजी उपसभापती अरविंद पाटील,बीडीओ चंद्रकांत साबळे,गट शिक्षण अधिकारी सुरेखा हिरवे, सरपंच तुषार गवळी,उपसरपंच संकेत पाटील,आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी वामन वाळकु पाटील,शरद राघो भगत,जयराम गवळी,लीलाबाई तरे,रमेश गवळी,वामन गवळी,अनसूया जामघरे यांचा सत्कार करण्यात आला.

Exit mobile version