। नेरळ । वार्ताहर ।
ऑगस्ट क्रांती दिन निमित्त कर्जत तालुक्यातील हुतात्मे हिराजी गोमाजी पाटील यांच्या स्मारकात अभिवादन करण्यात आले. शासकीय स्तरावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारक आणि हुतात्मे यांना अभिवादन करण्यात आले. तसेच हुतात्मा आणि क्रांतीकारक यांचे नातेवाईक यांचा सत्कार करण्यात आला.पंचायत समिती तसेच मानीवली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या अर्ध पुतळ्याला तहसीलदार विक्रम देशमुख यांचे हस्ते पुष्पचक्र वाहण्यात आले. त्यावेळी झेंडावंदन करुन राष्ट्रगीताने सलामी देण्यात आली. याप्रसगी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम साबळे, सुरेखा हिरवे राजेंद्र तेंडुलकर तुषार गवळी, संकेत पाटील,आदी उपस्थत होते.त्यावेळी स्वातत्र्यासैनिकाच्या नातेवाईक वामन पाटील, शरद भागात, शेखर भडसावळे, लीलाबाई तरे, अनसूया जामघरे, जयराम गवळी, रमेश गवळी, वामन गवळी आदींचा सत्कार करण्यात आला.