। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे वाणिज्य अभ्यास मंडळाचा उद्घाटन समारोह संपन्न झाला. या मंडळाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या भित्तीपत्रकांचे संकलन केले. यामध्ये आरबीआयची कार्यप्रणाली, हेन्री फेयॉल यांच्या व्यवस्थापनाची 14 तत्वे, ई-कॉमर्स, रेपो रेट इत्यादी विषयांवर भर देण्यात आला. तसेच मास्लो थेरी, लुका पॅसिलिओ, मार्शल, रिकार्डो यांची वाणिज्य व अर्थशास्त्र विषयातील योगदान याबद्दल माहितीचे सादरीकरण दर्पण म्हात्रे, ऐश्वर्या मढवी, भक्ती गुरव, सुश्मिता गायकर, हर्षाली पाटील यांनी केले.
प्र. प्राचार्य डॉ. पोटे यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाचे कौतुक करताना ई कॉमर्सचे दैनंदिन जीवनातील महत्व या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे यांनी वाणिज्य अभ्यास मंडळा अंतर्गत असे अनेक नावीन्यपूर्ण कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जाईल अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. तसेच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा. प्रीती पाटील तर आभार प्रा. अक्षय पाटील यांनी व्यक्त केले.