स्नेहल जगताप यांना वाढता पाठिंबा

। महाड । प्रतिनिधी ।

महाड विधानसभा मतदारसंघात 4 हजारपेक्षा जास्त नवीन मतदारांची नोंद झाली आहे. या नवमतदारांसह तरुणी व महिलांना आपला हक्काचा उमेदवार म्हणून स्नेहल जगताप यांना पाठिंबा दर्शविला आहे. तसेच, स्नेहल जगताप या शिक्षणासह रोजगार व आरोग्याचा प्रश्‍न मार्गी लावतील, असा विश्‍वास येथील मतदारांना आहे. यामुळे त्यांच्या प्रचारार्थ काढल्या जाणार्‍या प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे मत मयूर चांदोरकर यांनी व्यक्त केले आहे. संत रोहिदास नगर व आदर्श नगर या ठिकाणी सोमवारी (दि.11) सायंकाळी काढलेल्या प्रचार रॅली दरम्यान ते बोलत होते.

महाड शहरातील प्रचाराची रंगत वाढू लागली असून सर्वच प्रभागांसह सोसायटीमध्ये स्नेहल जगताप यांच्या विजयाची चर्चा होत आहे. स्नेहल जगताप यांना किती मताधिक्य मिळणार या पेक्षा तीनवेळा आमदार असलेले भरत गोगावले किती मतांनी पडणार याची चर्चा रंगू लागली आहे. संत रोहिदास नगर येथे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्या प्रचारार्थ पुष्पलता जगताप, संध्याताई जगताप, विजया जगताप, भारती सकपाळ, महाडीक, नीता शेठ, तृप्ती रत्नपारखी, अस्मिता शिंदे, प्रमोद महाडीक, मयूर चांदोरकर, प्रवीण चांदोरकर, शेखर महाडिक यांसह पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version