। सुतारवाडी । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा कुडली येथे दामिनी पथकाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महिला पोलीस हवालदार मा. बांद्रे व कोंजे यांनी इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना महिला व बाल सुरक्षा, सायबर सुरक्षितता तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी उपलब्ध असलेल्या हेल्पलाइन क्रमांकांची माहिती दिली. कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मोहन राठोड तसेच उपशिक्षक संदीप राठोड उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांना दामिनी पथकाकडून मार्गदर्शन
