नवीन फौजदारी कायद्यांचे मार्गदर्शन

अ‍ॅड. विलास नाईक यांचे रोहा न्यायालयात व्याख्यान

। नागोठणे । प्रतिनिधी ।

अधिवक्ता परिषद, रोहा व पाली यांच्यावतीने तसेच रोहा बार असोसिएशनच्या विशेष सहकार्याने रोहा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात नवीन फौजदारी कायदे या विषयावर अलिबाग येथील ज्येष्ठ विधीज्ञ आणि जिल्ह्याचे माजी सरकारी वकील अ‍ॅड. विलास नाईक यांचे व्याख्यान बुधवार दि. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी संपन्न झाले. यावेळी अ‍ॅड. विलास नाईक यांनी जुने फौजदारी कायदे व नवीन फौजदारी कायद्यात झालेले बदल, नवीन फौजदारी कायद्यातील महत्वाचे मुद्दे याविषयी सविस्तर माहिती उपस्थित वकील वर्गाला दिली.

अधिवक्ता परिषद, रोहा व पालीचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन कामकाजाच्या वेळेनंतर वकील संघटनेच्या दालनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोहा न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश सुनील महाले, सह न्यायाधीश श्रीमती मेघा हासगे, अधिवक्ता परिषदेचे कोकण प्रांत सचिव व अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील (केंद्र सरकार) अ‍ॅड. श्रीराम ठोसर, रोहा न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. आर.बी.सावंत, अ‍ॅड. सुनील सानप, रोहा अधिवक्ता परिषदेच्या उपाध्यक्षा अ‍ॅड. मीरा पाटील, अधिवक्ता परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य अ‍ॅड. स्वराज मोरे, अ‍ॅड. मनोज शिंदे, अ‍ॅड. स्वप्नील दिघे, अ‍ॅड. मयुरा मोरे, अ‍ॅड. दिपक सोळंकी, अ‍ॅड. भाग्यश्री मोरे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अ‍ॅड. महेश घायले, अ‍ॅड. दिनेश वर्मा, अ‍ॅड. शंकर हारपाल, अ‍ॅड. सचिन कारखानीस, अ‍ॅड. देवयानी मोरे, अ‍ॅड. सुरेखा चव्हाण, अ‍ॅड. ओमकार शिलधनकर, अ‍ॅड. प्रतीक पाटणकर, अ‍ॅड. शिवानी साळुंखे यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे मुद्देसूद प्रास्ताविक अ‍ॅड दिव्या सावंत यांनी, पाहुण्यांचा परिचय अ‍ॅड. अक्षरा देशमुख यांनी, सूत्र संचालन अ‍ॅड. शीतल सानप यांनी तर आभारप्रदर्शन अ‍ॅड. स्वरदा साने यांनी केले.

Exit mobile version